Lucknow Super Giants defeated Royal Challengers Bengaluru in IPL 2026
esakal
Lucknow Super Giants beat Royal Challengers Bengaluru : लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा धक्का दिला. LSG च्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात RCB ला अपयश आले. या पराभवामुळे गतविजेत्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. LSG चा हा १०व्या सामन्यातील तिसरा विजय ठरला असला तरी त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश जवळपास अशक्यच आहे. पण, काल पंजाब किंग्स आणि आज RCB च्या पराभवाने प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या अन्य संघांसाठी संधी निर्माण झाली आहे.