Arjun Tendulkar IPL debut for Lucknow Super Giants
Lucknow Super Giants vs Punjab Kings Marathi Cricket News: पंजाब किंग्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. पहिल्या सात सामन्यांत अपराजित राहिलेल्या पंजाबला सलग सहा सामन्यांत हार पत्करावी लागली आणि त्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. फलंदाजीत हा संघ इतरांपेक्षा वरचढ ठरला असला तरी, गोलंदाजांनी निराश केले आहे. PBKS ने जरी हा सामना जिंकला, तरी त्यांना इतर निकालांवर अवलंबून रहावे लागणार आहे. स्पर्धेतून बाहेर फेकले गेलेल्या लखनौने आज अखेर Arjun Tendulkar ला पदार्पणाची संधी दिली.