Ranji Trophy : विदर्भ अजूनही ६९ धावांनी पिछाडीवर ; मंत्रीच्या शतकामुळे मध्य प्रदेशला आघाडी

रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात विदर्भाविरुद्ध मध्य प्रदेशने पहिल्या डावात २५२ धावा केल्या. त्यापैकी पन्नास टक्के धावा हिमांशू मंत्रीने केल्या. त्यामुळे मिळालेल्या एक-दोन संधींचा फायदा विदर्भाच्या क्षेत्ररक्षकाने घेतला असता तर बहुतेक दुसऱ्या दिवसाअखेर चित्र वेगळे दिसले असते.
Ranji Trophy
Ranji Trophysakal

नागपूर : रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात विदर्भाविरुद्ध मध्य प्रदेशने पहिल्या डावात २५२ धावा केल्या. त्यापैकी पन्नास टक्के धावा हिमांशू मंत्रीने केल्या. त्यामुळे मिळालेल्या एक-दोन संधींचा फायदा विदर्भाच्या क्षेत्ररक्षकाने घेतला असता तर बहुतेक दुसऱ्या दिवसाअखेर चित्र वेगळे दिसले असते. दिवसाअखेर विदर्भाने दुसऱ्या डावात १ बाद १३ धावा केल्या असल्या तरी ते अजूनही ६९ धावांनी पिछाडीवर आहेत.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाईन्स मैदानावर सुरू असलेल्या या लढतीत सध्या ध्रुव शोरे आणि अथर्व तायडे बाद झाल्याने नाईट वॉचमन म्हणून अक्षय वखरे खेळपट्टीवर आहेत. आता ही नाबाद जोडी आणि उर्वरित फलंदाज किती धावा जोडतात यावर या सामन्यांचा रोमांच ठरवेल. सकाळी खेळ सुरू झाला त्यावेळी मध्य प्रदेशचे फलंदाज संयमी फलंदाजी करीत होते. हिमांशू मंत्री आणि हर्ष गवळी जोडी फोडायला चांगलीच मेहनत घ्यावी लागली.

अखेर यश ठाकूरने गवळीला पायचीत करून ही जोडी फोडली. त्यानंतर अचानक मध्य प्रदेशचा डाव ४ बाद ९३ असा गडगडला. त्यात उमेश यादवने कर्णधार शुभम शर्माचा उडवलेला त्रिफळाचाही समावेश आहे. त्यानंतर मंत्रीने सागर सोलंकीसोबत ५२ धावांची भागीदारी करून मध्य प्रदेशचा डाव सावरला. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सोलंकी बाद झाला. त्यानंतर पुन्हा मंत्रीने मध्य प्रदेशचा डाव सावरला. यावेळी त्याच्या सोबतीला सारांश जैन होता. दोघांनी ७३ धावांची भागीदारी केल्याने मध्य प्रदेशला आघाडी घेता आली.

Ranji Trophy
World Olympic Boxing : दीपक, नरेंदर यांची निराशाजनक सुरुवात

अखेर अक्षय वखरेने सारांश जैनला अमन मोखाडेद्वारे झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर उर्वरित फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. तरीही मध्य प्रदेशने २५२ धावांपर्यंत मजल मारली. त्यापूर्वीच हिमांशू मंत्रीने शतक साजरे केले होते. हे त्याचे विदर्भाविरुद्धचे दुसरे शतक होय.

संक्षिप्त धावफलक : विदर्भ पहिला डाव १७०, मध्य प्रदेश पहिला डाव २५२ (हिमांशू मंत्री १२६, १२ चौकार, १ षटकार, उमेश यादव ३-४०, यश ठाकूर ३-५१) विदर्भ दुसरा डाव १ बाद १३ (ध्रुव शोरे खेळत आहे १०, अक्षय वखरे खेळत आहे १, आवेश खान १-२).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com