इंग्लंडला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ७ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला.
हा सामना केवळ २७२ चेंडूत संपला आणि इंग्लंड–द.आफ्रिका इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी चेंडूंचा सामना ठरला.
इंग्लंडचा डाव फक्त १३१ धावांवर गडगडला, जेमी स्मिथने सर्वाधिक ५४ धावा केल्या.
England vs South Africa 1st ODI viral catch video : इंग्लंडला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. हा वन डे सामना २७२ चेंडूंत संपला आणि क्रिकेट इतिहातील ही या दोन संघांमधील दुसरी सर्वात कमी चेंडूंची वन डे मॅच ठरली. यापूर्वी २००८ मध्ये या नॉटिंगहॅम येथे झालेला सामना २२३ चेंडूंत संपला होता. इंग्लंडचा संपूर्ण संघ १३१ धावांवर गुंडाळल्यानंतर आफ्रिकेने २०.५ षटकांत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्यात रायन रिकेल्टनच्या कॅचने हवा केली.