Prithvi Shaw 71 runs vs Mumbai Vijay Hazare Trophy
esakal
Prithvi Shaw explosive innings against former team Mumbai : पृथ्वी शॉ विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज माजी संघ मुंबईच्या समोर शड्डू ठोकून उभा राहिला. महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वीने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबईच्या गोलंदाजांना चोप दिला. यावेळी पृथ्वी आणि मुंबईच्या गोलंदाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले. पृथ्वी व अर्शीन कुलकर्णी ( Arshin Kulkarni Century) यांनी महाराष्ट्राला दमदार सुरूवात करून दिली. पृथ्वीने १० चौकार व १ षटकारा अशा अवघ्या ११ चेंडूंत ४६ धावा चोपून मुंबईच्या गोलंदाजांना हतबल केले.