पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

Kolhapur International Cricket Stadium: कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे १२.७६ हेक्टर जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Cricket

Cricket

Sakal

Updated on

कोल्हापूर देखील आता जागतिक क्रीडा नकाशावर लवकरच दिसणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर येथे सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट स्टेडियम आहेत. पण आता यात कोल्हापूरचीही लवकरच भर पडेल.

नुकताच करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (१० फेब्रुवारी) मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी १२.७६ हेक्टर जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्याचे समजत आहे. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com