महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा यांचे निधन झाले आहे. निकोलस साल्दान्हा यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला आहे. .क्रिकेट जगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा यांचे गुरुवारी (१४ ऑगस्ट) निधन झाले आहे. ते महाराष्ट्राच्या इतिहासातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला, अशा भावना सध्या उमटत आहेत..Italian Athlete Dies: वर्ल्ड गेम्समध्ये धक्कादायक घटना! बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या खेळाडूचे चीनच्या हॉस्पिटलमध्ये निधन.निकोलस साल्दान्हा यांचे ८३ वर्षे वय होते. त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. ते उजव्या हाताने फलंदाजी करायचे, तर डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. त्यांना उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीही जमायची. त्याने अनेक वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी ५७ प्रथम श्रेणी सामने खेळताना १ शतकासह २०६६ धावा केल्या. तसेच त्यांनी १३८ विकेट्सही घेतल्या..२३ जून १९४२ मध्ये नाशिक येथे जन्म झालेल्या निकोलस साल्दान्हा यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नसली, तरी त्यांनी महाराष्ट्र संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.त्यांनी फलंदाजी करताना अनेकदा कठीण प्रसंगातून संघाला बाहेर काढले, तर त्यांची गोलंदाजीही प्रभावी होती. त्यामुळे ते त्यांच्या अष्टपैलू कौशल्यासाठी ओळखले जायचे. त्यांच्यासोबत आणि विरुद्ध खेळलेले खेळाडूंनी नेहमीच त्यांच्या शांत स्वभावाचे कौतुक केले आहे. त्यांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शनही दिले आहे..Hulk Hogan Dies: अनेकांचा लहानपणीचा WWE हिरो हल्क होगन काळाच्या पडद्याआड; क्रीडा विश्वात शोककळा.त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही शोक व्यक्त केला असून श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने लिहिले 'निकोलस हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होते. त्यांची मैदानातील कामगिरी आणि खेळाबद्दल असलेली निष्ठा नेहमीच सर्वांच्या मनात कायम राहिल.'.FAQs१. निकोलस साल्दान्हा कोण होते?➤ निकोलस साल्दान्हा महाराष्ट्राचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू होते.(Who was Nicholas Saldanha?)२. निकोलस साल्दान्हा यांचे वय किती होते?➤ निधनाच्या वेळी निकोलस साल्दान्हा ८३ वर्षांचे होते.(How old was Nicholas Saldanha at the time of his death?)३. निकोलस साल्दान्हा यांनी किती प्रथम श्रेणी सामने खेळले?➤ निकोलस साल्दान्हा यांनी ५७ प्रथम श्रेणी सामने खेळले.(How many first-class matches did he play?)४. निकोलस साल्दान्हा यांचा बॅटिंग आणि बॉलिंग रेकॉर्ड काय होता?➤ निकोलस साल्दान्हा यांचा २०६६ धावा केल्या व १३८ विकेट्स घेतल्या.(What was his batting and bowling record?).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.