Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

India women’s team World Cup 2025 prize details: भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ चा वर्ल्ड कप जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आणि या विजयात महाराष्ट्राच्या तीन लेकींचाही मोठा वाटा होता. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव या तिघींना महाराष्ट्र सरकारतर्फे प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
Maharashtra Government felicitates Smriti Mandhana, Jemimah Rodrigues, and Radha Yadav with ₹2.25 crore each

Maharashtra Government felicitates Smriti Mandhana, Jemimah Rodrigues, and Radha Yadav with ₹2.25 crore each

esakal

Updated on

Maharashtra announces reward for Women’s World Cup winners 2025: जेमिमा रॉड्रीग्ज, स्मृती मानधना आणि राधा यादव यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रत्येकी २.२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. भारतीय महिला संघाने नुकताच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि या ऐतिहासित जेतेपदात महाराष्ट्राच्या पोरींचा महत्त्वाचा वाटा होता. जेमिमाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची खेळी करून संघाला विश्वविक्रमी विजय मिळवून दिला होता. तर स्मृतीने या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आणि राधा यादवनेही अंतिम सामन्यात चांगली गोलंदाजी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com