Maharashtra's Vivek Shelar creates a sensation in SMAT 2026
esakal
Bhiwandi cricketer Vivek Shelar takes four wickets : इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) मधील सर्वात वेगवान गोलंदाज ठरलेल्या विवेक शेलारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत महाराष्ट्राकडून आजचा सामना गाजवला. त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात विवेकने चार विकेट्स घेतल्या आणि प्रतिस्पर्धींना २० षटकांत ९ बाद १८१ धावांवर रोखले. विवेकने टाकलेल्या २०व्या षटकात त्रिपुराने सलग चार फलंदाज गमावले, परंतु त्यात दोन रन आऊट होते. त्यामुळे संघाची डबल हॅटट्रिक झाली.