Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

Rohit Sharma fitness update before Rajasthan Royals match: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी महत्त्वाचे अपडेट्स दिले.
Rohit Sharma fitness update before Rajasthan Royals match

Rohit Sharma fitness update before Rajasthan Royals match

esakal

Updated on

Mahela Jayawardene on Mumbai Indians poor performance: मुंबई इंडियन्सचा संघ रविवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील शेवटचा साखळी सामना खेळायला वानखेडे स्टेडियमवर उतरणार आहे. मुंबईला सलग तिसऱ्या पर्वात अपयश पाहावे लागले आणि यावर्षी त्यांना १३ पैकी ९ सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रोहित शर्मालाही ( Rohit Sharma) दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले होते. अशात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या हंगामातील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून IPL 2026 चा निरोप घेण्याचा MI चा निर्धार आहे. पण, या सामन्यात रोहितच्या खेळण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com