

2026 Major Sports Calendar
Sakal
2026 Major Sports Calendar: भारतातील क्रीडाप्रेमींना या वर्षी चक्क दोन विश्वकरंडकाचा नजराणा अनुभवायला मिळणार आहे. पुरुषांचा टी-२० विश्वकरंडक फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत भारत व श्रीलंका येथे पार पडणार आहे. या स्पर्धेचे गतविजेते भारत असल्यामुळे या स्पर्धेमधून अजिंक्यपद राखण्याचा प्रयत्न टीम इंडिया करताना दिसणार आहे.
भारताच्या महिला क्रिकेट संघाने २०२५ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटवत ऐतिहासिक कामगिरी केली. आता २०२६मधील इंग्लंडमध्ये होत असलेल्या टी-२० विश्वकरंडकात पुन्हा आपला ठसा उमटवण्यासाठी भारतीय महिला सज्ज झाल्या आहेत.