

Smriti Mandhana
Sakal
भारतीय महिला क्रिकेट संघाची रनमशीन बनलेल्या स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) नुकतेच महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत खेळताना दोन मोठे विश्वविक्रम केले आहेत. गुरुवारी (३ सप्टेंबर) हाँगकाँगविरुद्ध खेळताना तिने ६४ चेंडूत १६४ धावांची खेळी केली.
या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजयासह बाद फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, या खेळीदरम्यान स्मृती मानधनाने अनेक विक्रम मोडले. तिच्या या खेळीनंतर आता माजी भारतीय कर्णधार डायना एडुलजी (Diana Edulji) यांनी मोठे भाष्य केले आहे.