SURYAKUMAR YADAV TURNS BODYGUARD FOR SANJU SAMSON – VIDEO VIRAL
esakal
Suryakumar Yadav protects Sanju Samson from crowd: भारतीय संघ पाचव्या व शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी थिरुवनंतपूरम येथे पोहोचला. चौथ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे पाचव्या सामन्यात सूर्यकुमार यादवचा संघ पुनरागमनाच्या इराद्याने मैदानावर उतरेल. केरळमधील सामन्यात सर्वांच्या नजरा लोकल बॉय संजू सॅमसन यांच्यावर असणार आहे. इथे त्याचा मोठा चाहतावर्ग आहे आणि याची प्रचिती विमानतळावर पोहोचताच आली. सूर्यकुमारनेही परिस्थिती पाहून संजूसोबत थोडी गंमत केली.