

Manav Suthar County Cricket Debut
Sakal
जूनच्या सुरुवातीलाच अफगाणिस्तानविरुद्ध दणक्यात कसोटी पदार्पण करणारा मानव सुथार (Manav Suthar) इंग्लंडमध्येही मैदान गाजवत आहे. भारताकडून मुल्लनपूरमध्ये कसोटी पदार्पणात ७ विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार मानवने या महिन्याच्या सुरुवातीलाच मिळवला होता.
२३ वर्षीय फिरकी गोलंदाज असलेल्या मानवने यापूर्वीही देशांतर्गत क्रिकेटमधून आपली प्रतिभा दाखवली होती. त्यानंतर यशस्वी कसोटी पदार्पणानंतर त्याला इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचीही संधी मिळाली. त्याने काऊंटी क्रिकेटमध्येही (County Cricket) आपली छाप पाडली असून सर्वांचे लक्ष वेधले आहे.