INDA vs AUSA : ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने रडवले; ८ बाद २७४ वरून ४२० धावांपर्यंत पोहोचले! Manav Suthar याने ५ विकेट्स घेऊन सावरले

Manav Suthar Strikes Back with Five-for : भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ या अनधिकृत कसोटी मालिकेत पहिल्या डावात रंगतदार घडामोडी पाहायला मिळाल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करताना पहिल्या डावात ४२० धावांचा डोंगर उभा केला.
Manav Suthar Shines with 5-Wicket Haul

Manav Suthar Shines with 5-Wicket Haul

esakal

Updated on
Summary
  • भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ दुसरा चार दिवसीय सामना लखनौ येथे खेळवला जात आहे.

  • मानव सुतारने १०७ धावांत ५ विकेट्स घेत भारताला मोठा दिलासा दिला.

  • नॅथन मॅकस्वीनी (७४) व सॅम कॉन्स्टास (४९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली.

India A vs Australia A unofficial Test match scorecard Marathi : भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यात दुसरा चार दिवसीय सामना लखनौ येथे खेळवला जातोय. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी होत असलेला हा सामना टीम इंडियात जागा मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. लेफ्ट आर्म स्पिनर मानव सुतार ( Manav Suthar) याने संधीचं सोनं केले. त्याने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. पण, ऑस्ट्रेलियाच्या दहाव्या व अकराव्या क्रमांकावरील फलंदाजांनी भारताची डोकेदुखी वाढवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com