बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवीन ब्रॉन्को टेस्ट लागू केली असून फिटनेस सुधारण्याचा हेतू सांगितला आहे.
इंग्लंड मालिकेत भारतीय खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले.
गौतम गंभीर कोच झाल्यानंतर ताबडतोब टेस्ट न आणता, नवीन S&C कोच Adrian Le Roux आल्यानंतर ती लागू करण्यात आली.
Will Rohit Sharma retire before ODI World Cup 2027? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) भारतीय खेळाडूंसाठी नुकतीच ब्रोन्को टेस्ट आणण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंची तंदुरुस्ती सुधारावी आणि मैदानावरील कामगिरीतही सुधारणा व्हावी या त्यामागचा हेतू आहे. रग्बी खेळाडूंसाठी ही ब्रोन्को टेस्ट वापरली जाते आणि त्यात बरेच मापदंड असतात. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या समस्या उद्भवल्या होत्या आणि त्यामुळे बीसीसीआयने ब्रोन्को टेस्टचे पाऊल उचलले आहे. पण, आता यावरून वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.