
Asia Cup Champions 2025
sakal
दुबई : कुलदीप यादव, अक्षर पटेल व वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूंनी पाकिस्तानला १४६ धावांवर रोखल्यानंतर तिलक वर्मा (नाबाद ६९ धावा) याने संजू सॅमसन व शिवम दुबे यांच्या साथीने भारतीय संघाला पाकिस्तानी संघावर पाच विकेट राखून विजय मिळवून दिला. भारताने नवव्यांदा आशियाई करंडकाच्या अजिंक्यपदावर मोहर उमटवली.