

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत बहुप्रतिक्षीत सामन्यांपैकी एक सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील असतो. हा सामना १८ व्या आयपीएल हंगामात शुक्रवारी (२८ मार्च) पाहायला मिळणार आहे.
हा या हंगामातील ८ वा सामना असणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे.