CSK vs RCB सामन्याची तुफान क्रेझ; एका तिकीटाची किंम्मत तब्बल ७५०० रूपये, जाणून घ्या विक्रीची तारीख अन् वेळ

CSK vs RCB IPL 2025: शुक्रवारी, चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू सामन्याचा थरार रंगणार आहे.
CSK vs RCB IPL 2025
CSK vs RCB IPL 2025esakal
Updated on

CSK vs RCB Ticket Price, Selling Date and Time: शुक्रवारी, २८ मार्च रोजी चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले. तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सला हरवले. त्यामुळे दोन विजयी संघांमधील सामन्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुकता दाखवत आहे. सामन्याच्या तिकीट विक्रीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com