SA vs ENG: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला, इंग्लंडविरुद्ध Matthew Breetzke ने भारतीय दिग्गजाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

SA Create History in England: दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडच्या भूमीवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल २७ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये द्विपक्षीय वन डे मालिका जिंकून त्यांनी विक्रम नोंदवला. या मालिकेत युवा फलंदाज मॅथ्यू ब्रिट्झके याने भारतीय दिग्गजाचा जागतिक विक्रम मोडला आणि क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरला.
Matthew Breetzke broke an Indian legend’s world record

Matthew Breetzke broke an Indian legend’s world record

esakal

Updated on
Summary
  • दक्षिण आफ्रिकेने दुसरा वन डे ५ धावांनी जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

  • २७ वर्षांनंतर आफ्रिकेने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.

  • मॅथ्यू ब्रिट्झकेने ७७ चेंडूंत ८५ धावा करून भारतीय दिग्गजाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

Matthew Breetzke record-breaking innings in SA vs ENG ODI series : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ५ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. २७ वर्षानंतर आफ्रिकेने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मॅथ्यू ब्रिट्झके याने या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवताना भारतीय दिग्गजाला मागे टाकले. आफ्रिकेच्या ८ बाद ३३० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला ९ बाद ३२५ धावा करता आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com