Matthew Hayden’s bold prediction
esakal
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने पैज लावली आहे की जो रूट शतक करू शकला नाही तर तो MCG वर विवस्त्र फेऱ्या मारेन.
जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
2021 नंतर रूटने 61 कसोटी सामन्यांत 5720 धावा, 22 शतकं आणि 17 अर्धशतकं झळकावली आहेत.
Matthew Hayden bold prediction on Joe Root Ashes 2025-26 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. इंग्लंडचा फलंदाज जो रूट चांगल्या फॉर्मात आहे, परंतु त्याला ऑस्ट्रेलियात शतक झळकावता आलेले नाही. पण, या दौऱ्यावर जो रूट शतकांचा दुष्काळ संपवेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन याने व्यक्त केला आहे. तसे न झाल्यास मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ( MCG) तो विवस्त्र होऊन फेऱ्या मारेल, अशी पैज त्याने लावली आहे. त्यावर हेडनची मुलगी ग्रेस हिची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.