
Vijay Hazare Trophy Karnataka vs Hyderabad: भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल सध्या तुफान फॉर्ममध्ये खेळत आहे. तो सध्या कर्नाटक संघाचा कर्णधार असून विजय हजारे ट्रॉफी या लिस्ट ए देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेतून खेळाडू छाप सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मयंकनेही त्याची छाप सोडली असून आता सलग तीन शतके झळकावली आहेत.