

Mumbai Cricket Team
Sakal
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) वार्षिक करारासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून १५ खेळाडूंना करार देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. या कराराच्या यादीतून बीसीसीआयचा करार असलेल्या आणि आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना वगळण्यात येणार आहे.
म्हणजेच रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सर्फराज खान यांच्यासह १५ खेळाडूंना हा करार मिळणार नाही. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे १५ खेळाडू सध्या बीसीसीआयच्या करार यादीत आणि आयपीएलमध्येही खेळत आहे.