

MCA Corporate Shield Trophy
Sakal
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) तर्फे एमसीए कॉर्पोरेट शिल्ड ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या सीझनचे अनावरण पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. बीसीसीआयच्या एकदिवसीय सामन्यांच्या नियमांनुसार ५० षटकांच्या स्वरूपात ही स्पर्धा खेळवली जाते. ही प्रतिष्ठित स्पर्धा राज्यातील अग्रगण्य कॉर्पोरेट क्रिकेट लीग म्हणून नावारूपाला आली आहे.