Abhigyan Kundu vs Vaibhav Suryavanshi
esakal
Abhigyan Kundu vs Vaibhav Suryavanshi: भारताचा १९ वर्षांखालील युवा संघ वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन विजयांसह त्यांच्या गटात आघाडीवर आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत आव्हानात्मक खेळपट्टीवर अभिग्यान कुंडू याने ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ११२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार लगावले आणि भारताला सन्माजनक धावसंख्या उभारून दिली. सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशी व आयुष म्हात्रे यांच्याकडे असताना अभिग्यान मैदान गाजवतोय.