Rohit Sharma and MS Dhoni may miss the MI vs CSK clash at Wankhede
esakal
Rohit Sharma, MS Dhoni Unlikely to Start at Wankhede: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज इंडियन प्रीमिअर लीगमधील एल क्लासिको सामना रंगणार आहे. रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनी, हे भारताचे दोन लाडके कर्णधार आमनेसामने येण्याची शक्यता आहे... होय शक्यताच, कारण दोन्ही खेळाडू सध्या दुखापतीसोबत संघर्ष करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार धोनी IPL 2026 मध्ये अजून एकही सामना खेळलेला नाही, तेच मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांना मुकला आहे. त्यामुळेच MI vs CSK लढतीत हे दोघंही मैदानावर उतरतील, हीच एक अपेक्षा ठेवून चाहत्यांची पावलं वानखेडेच्या दिशेने वळली आहेत. पण, अशात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.