Mumbai Indians vs Chennai Super Kings Marathi Updates
esakal
Mumbai Indians vs Chennai Super Kings Marathi Updates: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा एल क्लासिको सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनी, या भारतीय क्रिकेटमधील दोन मोठ्या नावांनी घडवलेले हे संघ आज आमनेसामने आहेत. पण, या दोन दिग्गजांच्या खेळण्यावरच प्रश्नचिन्ह आहे. धोनीने IPL 2026 मध्ये अद्याप एकही सामना खेळलेला नाही, तेच रोहितला दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांना मुकावे लागले आहे.