Sanju Samson battles alone as CSK batters struggle against Mumbai Indians at Wankhede.
esakal
Mumbai Indians vs Chennai Super Kings Marathi Updates: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) एकटा भिडला. त्याला अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने, CSK ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सर्फराज खान व शिवम दुबे, हे मुंबईकर खेळाडू त्यांच्या परिचित मैदानावर धुमाकूळ घालतील असे वाटले होते. पण, दोघांनी निराश केले. दोघंही त्रिफळाचीत झाले. मात्र, संजू मैदानावर शेवटपर्यंत उभा राहिला आणि IPL 2026 मधील दुसरे शतक पूर्ण केले. Sanju Samson century