Lizelle Lee pulls off an unbelievable catch against Mumbai Indians
esakal
Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्स महिला प्रीमिअर लीगमध्ये विजयपथावर परण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना तगडे लक्ष्य उभे करण्याचे आव्हान मिळाले आहे. या सामन्यातून दिल्ली कॅपिटल्सच्या जेमिमा रॉड्रीग्जने ( Jemimah Rodrigues ) कर्णधार म्हणून पदार्पण केले. महिला वर्ल्ड कप गाजवणाऱ्या जेमिमाला WPL हंगामापूर्वी DC ने जेमिमाची कर्णधारपदी नियुक्ती केली. आजच्या सामन्यात नाणेफेकीला आली तेव्हा तिने इतिहास रचला. WPL मधील ती सर्वात तरुण वयाची कर्णधार ठरली. ती २५ वर्ष व १२७ दिवसांची आहे आणि जेमिमाने स्मृती मानधनाचा ( २६ वर्ष व २३० दिवस, WPL 2023) विक्रम मोडला.