MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Rohit Sharma reaction to Shreyas Iyer catch MI vs PBKS: आयपीएल २०२६ मध्ये Mumbai Indians विरुद्ध Punjab Kings सामन्यात एक अविश्वसनीय क्षण पाहायला मिळाला. श्रेयस अय्यर याने घेतलेला झेल हा ‘कॅच ऑफ द सीझन’ ठरू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
Rohit Sharma reaction to Shreyas Iyer catch MI vs PBKS

Rohit Sharma reaction to Shreyas Iyer catch MI vs PBKS

Updated on

Shreyas Iyer Pulls Off Blinder! Hardik Pandya Falls To Stunning Effort: क्विंटन डी कॉकचे शतक अन् नमन धीरच्या अर्धशतकाने मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या आजच्या सामन्यात पुनरागमन करून दिले. पंजाब किंग्सचा प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेत MI ची अवस्था २ बाद १२ अशी दयनीय केली होती. पण, क्विंटन व नमन यांच्या १२२ धावांनी MI ला सामन्यात पुन्हा आणले. मात्र, श्रेयस अय्यरच्या एका अफलातून झेलने हा सामना सर्वांच्या लक्षात राहिल. मुंबई इंडियन्सच्या डग आऊट जवळ टिपलेल्या या झेलने रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी स्तब्ध केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com