MI vs RCB WPL: 0,0,0,0,0,0,0,0,0,0,1,0! १२ चेंडूंत ११ निर्धाव! lauren bell ने दिला मुंबई इंडियन्सला जबर घाव; विकेटही घेतली अन्...

MI vs RCB WPL 2026 Lauren Bell debut performance : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या युवा वेगवान गोलंदाज लॉरेन बेलने आपल्या पदार्पणातच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्या दोन षटकांत तिने तब्बल ११ निर्धाव चेंडू टाकत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांवर जबरदस्त दबाव निर्माण केला. तिने दबाव नर्माण करून एक विकेटही घेतली.
Lauren Bell produces a sensational spell on debut, bowling 11 dot balls in her first two overs

Lauren Bell produces a sensational spell on debut, bowling 11 dot balls in her first two overs

esakal

Updated on

Lauren Bell powerplay bowling against Mumbai Indians : महिला प्रीमिअर लीग २०२६ ला आजपासून सुरुवात झाली. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध माजी विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना होत आहे. स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) नाणेफेक करून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सला सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला. संघातील प्रमुख खेळाडू हॅली मॅथ्यू ( Hayley Mathews ) हिला आजारपणामुळे सामन्याला मुकावे लागले. RCB कडून सहा खेळाडू पदार्पण करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com