

Mumbai Indians players will wear black armbands in MI vs SRH match
esakal
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Marathi Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सला आता प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज ते सनरायझर्स हैदराबादचा सामना करत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु रोहित शर्मा आजच्या सामन्यात खेळणार नसल्याने चाहते निराश झाले. मुंबईसाठी आजचा सामना जरा भावनिक आहे, मुंबई इंडियन्सच्या संघातील सदस्याच्या मुलीचे निधन झाले आणि तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी संघ दंडावर काळी पट्टी बांधून खेळणार आहेत.