Ryan Rickelton’s Century Headlines MI’s Dominant Batting Display
esakal
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Marathi Update: रायन रिकल्टनने ( Ryan Rickelton) मुंबईचे वानखेडे मैदान गाजवले.. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील आव्हान टीकवण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यात रोहित शर्मा पुनरागमन केव्हा करेल, या प्रश्नाचं उत्तर कर्णधार हार्दिक पांड्यालाही देता आलेले नाही. त्यामुळेच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध MI ने नवी ओपनिंग जोडी मैदानावर उतरवली आणि हा प्रयोग यशस्वी ठरला. रिकल्टनने MI कडून वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम नावावर करताना SRH समोर तगडे आव्हान उभे केले. मुंबई आजच्या सामन्यात या पर्वातील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडतील असे चित्र होते, परंतु हैदराबादने शेवटच्या चार षटकांत चांगले पुनरागमन केले.