AUS vs NZ 1st T20I : ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपसाठी जोरात तयारी! Mitchell Marsh च्या फटकेबाजीने १६.३ षटकांत जिंकला सामना

Australia vs New Zealand 1st T20I : ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. १८२ धावांचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने केवळ १६.३ षटकांत पूर्ण केला.
Mitchell Marsh 85 off 43 vs NZ full performance

Mitchell Marsh 85 off 43 vs NZ full performance

esakal

Updated on

Australia chase 182 in 16.3 overs vs New Zealand highlights : न्यूझीलंडच्या टीम रॉबिन्सनचे शतक व्यर्थ गेले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेणाऱ्या ऑसींनी पराक्रम केला. त्यांनी १८२ धावांचे लक्ष्य १६.३ षटकांत पार केले. २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या १७ पैकी १५ ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com