
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक संघातील खेळाडू त्या त्या संघात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. याचवेळी काही संघांना खेळाडूंच्या दुखापतीचीही चिंता आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव तर पहिल्या टप्प्याला मुकणार, हे जवळपास स्पष्ट आहे. त्यातच त्यांना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू मिचेल मार्शचीही चिंता होती. पण आता लखनौ दिलासा मिळाला आहे.