

Mitchell Santner | India vs New Zealand | T20 World Cup 2026
Sakal
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असून सामन्याच्या पूर्वसंध्येलाच न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटेनरच्या (Mitchell Santner) शब्दांनी भारतीयांना २०२३ वर्ल्ड कपची आठवण करून दिली आहे.
२०२३ वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामना (ODI World Cup 2023 Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादमध्येच झाला होता, ज्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता. त्यावेळी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले होते की त्याला अहमदाबादच्या प्रेक्षकांना शांत करायचं आहे. यावेळीही सँटेनरने अशाप्रकारचं भाष्य केले आहे.