ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
कसोटी क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक आणि २०२७ वन डे वर्ल्डकप लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला.
स्टार्कने ६५ टी२० सामने खेळून ७९ विकेट्स घेतल्या असून तो दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.
Mitchell Starc has announced his retirement from T20Is : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने मंगळवारी पहाटे सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियन संघाच्या कसोटी क्रिकेटचं व्यग्र वेळापत्रक अन् २०२७ चा वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.