India vs AustMitchell Starc Equals Ashwin-Jadeja’s Rare Double in WTC
esakal
Ashes Australia vs England 2nd Test : ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १७७ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या ३३४ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ५११ धावा केल्या. या सामन्यात मिचेल स्टार्क ( Mitchell Starc ) पहिल्या डावातील नायक ठरला. त्याने ६ विकेट्स घेत इंग्लंडला धक्के दिले आणि त्यानंतर फलंदाजीत अर्धशतक झळकावून संघाच्या आघाडीत महत्त्वाचे योगदान दिले. या अष्टपैलू कामगिरीसह त्याने एका विशेष विक्रमात स्वतःच्या नावाची नोंद करून घेतली आहे.