MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Mitchell Starc and Shoriful Islam: ऑस्ट्रेलिया-बांगलादेश दुसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्क आणि शोरिफुल इस्लाम यांनी सहा-सहा बळी घेत इतिहास रचला. १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात एकाच सामन्यात दोन डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी सहा बळी घेण्याची ही दुसरी वेळ ठरली.
MITCHELL STARC

MITCHELL STARC

esakal

Updated on

Mitchell Starc and Shoriful Islam: ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात एक अनोखा पराक्रम पाहायला मिळाला. मिचेल स्टार्क आणि शोरिफुल इस्लाम या दोन्ही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी काही तासांच्या अंतराने सहा-सहा बळी घेतले. कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात एकाच सामन्यात दोन डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी सहा बळी घेण्याची ही केवळ दुसरी वेळ ठरली.

यापूर्वी असा पराक्रम १९५८-५९ च्या नववर्ष ऍशेस कसोटीत झाला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ॲलन डेव्हिडसनने पहिल्या डावात ६/६४ अशी गोलंदाजी केली होती. त्यानंतर इयान मेकिफने दुसऱ्या डावात ६/३८ अशी कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com