

Bangladesh Cricket Team
Sakal
भारत - पाकिस्ताननंतर आता भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील संबंधही तणावपूर्ण झाले आहेत. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रालाही बसत आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर आत्याचार होत असलेल्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे हे संबंध बिघडले असून आता भारतात बांगलादेश क्रिकेटलाही विरोध होत आहे.
आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ स्पर्धेत बांगलादेशच्या मुस्तफिजूर रेहमानला (Mustafizur Rahman) खेळवण्यावर बराच विरोध देशभरातून झाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) त्याला संघातून काढून टाकण्याचे निर्देश कोलकाता नाईट रायडर्सला दिले होते. त्यानुसार मुस्तफिजूरला कोलकाता संघाने संघातून काढण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली.