Shreyas Iyer and Ishan Kishan : बीसीसीआयचा निर्णय योग्यच ; कपिल देव

बीसीसीआयने श्रेयस अय्यर व इशान किशन यांना वार्षिक करारातून वगळल्यानंतर चोहोबाजूंनी प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही व्यक्तींनी बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक केले, तर काही व्यक्तींनी सर्वांसाठी एकसारखा नियम असायला हवा, असे स्पष्ट केले.
Shreyas Iyer and Ishan Kishan
Shreyas Iyer and Ishan Kishansakal

नवी दिल्ली : बीसीसीआयने श्रेयस अय्यर व इशान किशन यांना वार्षिक करारातून वगळल्यानंतर चोहोबाजूंनी प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही व्यक्तींनी बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक केले, तर काही व्यक्तींनी सर्वांसाठी एकसारखा नियम असायला हवा, असे स्पष्ट केले.

याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त करताना म्हटले की, बीसीसीआयच्या निर्णयामुळे काही खेळाडूंचे नुकसान होईल; पण देशापेक्षा कोणीही मोठा नाही आहे. त्यांचा निर्णय योग्यच आहे.

Shreyas Iyer and Ishan Kishan
Pro Kabaddi Final Match 2024 : प्रो कबड्डीत पुणे प्रथमच चॅम्पियन ; अंतिम सामन्यात हरियानावर मात

कपिल देव पुढे सांगतात की, स्थानिक क्रिकेटला वाचवण्यासाठी बीसीसीआयने उचलले पाऊल उत्तम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रुजल्यानंतर काही खेळाडू स्थानिक क्रिकेटला प्राधान्य देत नाहीत. ही बाब नेहमीच खटकते. बीसीसीआयकडून खेळाडूंना कडक इशारा देण्यात आला आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंनी आपआपल्या राज्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com