MLC 2025: ४१ वर्षीय फॅफ ड्यू प्लेसिसचा 'सुपर मॅन' कॅच, फिरली मॅच; मुंबई इंडियन्सचा संघ ३ धावांनी हरला Video Viral

41-year-old Faf du Plessis flying catch MLC 2025 video : अमेरिकेत सुरू असलेल्या Major League Cricket मध्ये फॅफ ड्यू प्लेसिसने अफलातून झेल टिपला आणि मुंबई इंडियन्सचा कार्यक्रम केला. फॅफच्या कॅचने पूर्ण मॅच फिरली आणि टेक्सास सुपर किंग्सने तीन धावांनी बाजी मारली.
Faf du Plessis Takes Stunning Catch
Faf du Plessis Takes Stunning Catchesakal
Updated on

TEXAS SUPER KINGS BEAT MI NEW YORK : मेजर लीग क्रिकेटमध्ये चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीच्या मालकी हक्क असलेल्या टेक्सास सुपर किंग्स संघाने शनिवारी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या MI न्यू यॉर्क संघावर ३ धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली. टेक्सासच्या ६ बाद १८५ धावांचा पाठलाग करताना न्यू यॉर्क संघाने चांगला खेळ केला होता. पण, १४व्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसच्या अविश्वसनीय झेलने मॅच फिरवली आणि न्यू यॉर्कला ३ धावांनी हार मानावी लागली. ४१ वर्षीय फॅफच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com