
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन गेल्या काही महिन्यांपासून वादात अडकलेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला आदेश मिळाला होता की राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील एका स्टँडवरी अझरुद्दीन यांचे नाव हटवण्यात यावे.
त्यानंतर हैदराबादने कारवाईलाही सुरुवात केली आहे, पण याबाबत अझरुद्दीन यांनी नाराजी व्यक्त केली असून न्यायालयात धाव घेण्याचीही तयारी दाखवली आहे. तसेच बीसीसीआयने या प्रकरणात लक्ष घालावे असंही त्यांनी म्हटले आहे.