

Rohit Sharma - Virat Kohli | Team India
Sakal
Rohit Sharma - Virat Kohli News: भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये वनडे मालिका खेळत असून तिसरा आणि अखेरचा सामना लॉर्ड्सच्या मैदानात रविवारी खेळवला जाणार आहे. ही मालिका आगामी २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठी संघबांधणीच्या तयारीच्यादृष्टीने महत्त्वाची असल्याचे यापूर्वीच शुभमन गिलने स्पष्ट केले होते.
पण असे असतानाच आता रोहित शर्मा या वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार त्याला भारतीय संघव्यवस्थापन या वर्ल्ड कपसाठी विचारात घेण्याची शक्यता कमी असल्याने तो लॉर्ड्सवर अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकतो.