'अरे, मला कॉल का करताय?' मोहम्मद रिझवान रडकुंडीला आला, पाकिस्तान क्राईम एजन्सीला विचारला जाब; त्याने नेमकं असं केलं तरी काय?

Mohammad Rizwan NCCIA investigation latest news: मोहम्मद रिझवानने NCCIA च्या चौकशीबाबत पत्र लिहून त्याला का बोलावण्यात आले, याचा जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे.
Mohammad Rizwan NCCIA investigation latest news

Mohammad Rizwan NCCIA investigation latest news

esakal

Updated on

Pakistan cricketer Mohammad Rizwan NCCIA summons: पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान सध्या एका चौकशीमुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण संस्था अर्थात NCCIA कडून त्याच्याविरोधात चौकशी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. इंग्लंड दौऱ्यावरून त्याला दुसऱ्या कसोटीनंतर घरी पाठवण्यात आले आणि आता त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. त्यामुळे चिडलेल्या रिझवानने थेट NCCIA ला जाब विचारणारे पत्र लिहिले आहे. त्यात त्याने, माझी चौकशी का केली जात आहे, असा प्रश्न विचारल्याचे वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com