Mohammed Shami Strikes Back Bengal vs Haryana Match
esakal
Mohammed Shami Strikes Back Bengal vs Haryana Match : वन डे सामन्यात भारताला ३४९ धावांचा यशस्वी बचाव करण्यात अपयश आल्यानंतर अनेकांनी मोहम्मद शमी कुठेय? असा सराव निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना केला. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाजी नवखी आहे. अशात मोहम्मद शमीची निवड का केली जात नाही, हा प्रश्न अनेकांना सतावतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फायनलनंतर शमी भारतीय संघाबाहेरच आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला डावलले जात आहे. पण, शमी हार मानणारा नाही आणि तो सातत्याने मैदान गाजवतोय.