Mohammed Shami opens up on his ODI exclusion : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या वन डे संघात मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा या दोन अनुभवी खेळाडूंची नाव नाहीत. शमीने २०२३ चा वर्ल्ड कप गाजवला आणि त्यानंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे. त्याने पुनरागमनासाठी प्रयत्न केले आणि फिटनेसही सिद्ध केली, तरीही त्याला वन डे संघात स्थान मिळत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये शेवटचा भारताच्या वन डे संघातून खेळला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वन डे संघात त्याला संधी मिळेल असे वाटले होते, परंतु त्याला डावलले गेले. त्यावर शमीने मत व्यक्त केले आहे.