Mohammed Shami video after being dropped from Team India
esakal
Team India selection controversy Mohammed Shami reaction: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी भारतीय संघ जाहीर केला. रिषभ पंतच्या पुनरागमन होत असताना या संघात आकाश दीपनेही स्थान पटकावले. बंगालच्या आकाश दीपला संधी देताना पुन्हा एकदा मोहम्मद शमी दुर्लक्षित राहिला. इंग्लंड दौऱ्यावरही शमीची निवड झालेली नव्हती, त्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळला. त्यातही शमीला स्थान नाही मिळाले आणि आता आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही निवड समितीने त्याला दूरच ठेवले.