विराट-रोहित, अश्विन-पुजारानंतर मोहम्मद शमीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या.
शमीने स्पष्ट केले की सध्या त्याला निवृत्तीचा कोणताही विचार नाही.
इंग्लंड दौऱ्यासाठी व आशिया कपसाठी त्याची निवड न झाल्यानेही तो खेळत राहणार आहे.
Indian fast bowler Mohammed Shami shuts critics: भारतीय क्रिकेट संघात सध्या निवृत्तीचे वारे वाहताना दिसत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या कसोटीतील निवृत्तीनंतर आर अश्विन व चेतेश्वर पुजारा यांनी सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यात जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर शमीने मोठे भाष्य केले आणि सध्यातरी निवृत्तीचा कोणताच विचार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.