मोहम्मद शमीने झळकावले गौतम गंभीरच्या 'माणसा'समोर वादळी अर्धशतक; बंगालच्या Sudip Gharami चे त्रिशतक एका धावेने हुकले

Mohammed Shami 30 ball fifty Ranji Trophy quarters: रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीत मोहम्मद शमीने फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे ही वादळी खेळी गौतम गंभीरचा ‘माणूस’ मानला जाणारा राष्ट्रीय निवड समिती सदस्य आर. पी. सिंग याच्या उपस्थितीत झाली.
Mohammed Shami slammed a rapid 30-ball half-century in the Ranji Trophy quarterfinal

Mohammed Shami slammed a rapid 30-ball half-century in the Ranji Trophy quarterfinal

esakal

Updated on

Sudip Gharami misses triple century by one run Ranji: बंगाल संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आंध्रविरुद्ध मजबूत आघाडी घेतली आहे. आंध्रच्या पहिल्या डावातील २९५ धावांच्या प्रत्युत्तरात बंगालने ६२९ धावा कुटल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आंध्रने दुसऱ्या डावात ६४ धावांत ३ फलंदाज गमावले होते आणि ते अजूनही २७० धावांनी मागे आहेत. पण, या सामन्यात मोहम्मद शमीचे ( Mohammed Shami ) वादळी अर्धशतक अन् सुदीप घरमीचे हुकलेले त्रिशतक चर्चेत राहिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com